पुणे

स्ट्रक्चरल ऑडिट सादर करा

CD

जुन्नर, ता. १६ : घाटकोपर (मुंबई) येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर जुन्नर नगरपालिकेने अनधिकृत होर्डिंगधारकांना नोटिसा बजावल्याचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सांगितले.
जुन्नर नगर पालिकेच्या हद्दीत लोखंडी होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी न घेतलेल्या तिघांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आपल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा दाखला पंधरा दिवसांच्या आत नगरपालिकेत सादर करावा, तसेच अनधिकृत होर्डिंगला परवानगी घेण्यासाठी रीतसर अहवाल सादर करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
पावसाळी वातावरणात वादळात होर्डिंग कोसळ्याच्या घटना घडत आहेत. आपण उभारलेल्या होर्डिंगमुळे आजूबाजूच्या परिसरात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. विनापरवाना, तसेच सुरक्षतेची कोणतीही काळजी न घेता उभारलेले होर्डिंग नियमांचे उल्लंघन करणारे आहे, असे होर्डिंगधारकांना कळविले आहे.
विनापरवाना व स्ट्रक्चरल ऑडिट न केलेली सर्व होर्डिंग अनधिकृत समजून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल व होर्डिंगचे साहित्य जप्त करण्यात येईल. तसेच, होर्डिंग काढण्याचा खर्च दंडासह वसूल करण्यात येईल, अथवा संबंधित मालमत्तेच्या करामध्ये लावण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.

फ्लेक्सलाही परवानगी बंधनकारक
मागील वर्षी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या मुख्य चौकात उभारलेल्या सुमारे चाळीस फूट उंचीच्या फ्लेक्समुळे जुन्नर शहर व परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने फ्लेक्सधारकांना मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पूर्वपरवानगी घेऊनच फ्लेक्स लावणे बंधनकारक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT