पुणे

पाडळीत केबल्स चोरीमुळे शेतकरी त्रस्त

CD

जुन्नर, ता. २ : पाडळी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल्स चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत असून या प्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून केबल्स चोरटे शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी जुन्नर पोलिसांकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन शेतकरी तसेच ग्रामपंचायत पाडळी (बारव) यांच्यावतीने पोलीसांना देण्यात आले. या निवेदनावर शरद कबाडी, राजेंद्र कबाडी, बाळू पापडे व इतर २६ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

या शेतकऱ्यांनी शेतीला पाणीपुरवठ्यासाठी कुकडी नदी किनारी विदुयत मोटारी बसविल्या आहेत. या मोटारींच्या केबल्स वारंवार चोरीला जात असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी गाव पातळीवर बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. मागील आठवड्यात सुमारे ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याची घटना घडली असून यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केबल चोरीच्या घटनांचा तपास करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT