जुन्नर, ता. ३० : आदिवासी भागातील राजूर (ता. जुन्नर) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात परिसरातील ११२ नागरिकांनी सहभाग घेऊन विविध तपासण्या करवून घेतल्याचे आयुष राजूर पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गोसावी यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत राजूर आयुष केंद्र, ग्रामपंचायत व डिसेंट फाउंडेशनने गुरुवारी (ता. २९) या शिबिराचे आयोजन केले होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यात नेत्ररोग, हृदयरोग, मूत्ररोग, स्त्रीरोग, रक्तदाब, मधुमेह, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या.मोतीबिंदूच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकर आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून त्यांना शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, औषधे व चष्मे आदी मोफत दिले जाणार आहे. तसेच हृदयविकार अथवा मूत्ररोगाशी संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केल्या जाणार आहेत.
यावेळी डिसेंट फाउंडेशनचे जितेंद्र बिडवई, सचिव एफ.बी. आतार, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मुंढे, सरपंच ज्योत्स्ना मुंढे, सदस्य संदीप मुंढे, संगीता पठारे, हिराबाई मुंढे, चैत्राली केंगले, पोलिस पाटील रामदास मुंढे, शशिकांत घायतडके, प्रकाश पाटील, संतोष शिंदे, डॉ. विजया गावित, आरोग्य सेविका रंजना कदम, अलका मुंढे, आरोग्य सेवक सुनील पवार, संदीप मुंढे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोसावी यांनी केले. सरपंच ज्योत्स्ना मुंढे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.