पुणे

ज्येष्ठ नागरिकांनी बीसीजी लस घ्यावी ः डॉ. कुळमेथे

CD

जुन्नर, ता. १५ : क्षयरोग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी बीसीजी लसीकरण मोहीम तालुक्यात सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बीसीजी लस घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे यांनी केले.

तालुक्यातील आळे, आपटाळे, बेल्हे, इंगळूण, मढ, निमगावसावा, पिंपळवंडी, ओतूर, राजुरी, सावरगाव, शिरोलीबुद्रुक, वारूळवाडी, येणेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत सप्टेंबर महिन्यात क्षयरोग प्रतिबंधक (बीसीजी) लसीकरण कॅम्पचे आयोजन केले आहे. तालुक्यातील लसीकरण पात्र ज्येष्ठांची संख्या ५० हजार ८०८ इतकी असून बुधवारपर्यंत (ता. ११) एकूण ७६ सत्रातून २३९७ जणांचे लसीकरण झाले आहे.

या मोहिमेचा लाभ साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. जन्मानंतर प्रत्येक बाळाला बीसीजी लस दिली जात असली तरी वयोमानुसार आपली प्रतिकार क्षमता कमी होत जाते. यामुळे शासनाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी साठ वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी बीसीजी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरणासाठी आपल्या भागातील आरोग्य उपकेंद्र किंवा अंगणवाडीत लसीकरणाचे नियोजन केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या भागातील आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधावा.
लस घेण्याची सक्ती केली जाणार नाही. अति जोखीममध्ये येत असलेल्या १८ वर्षांवरील तरुण-तरुणींना सुद्धा या मोहिमेत लसीकरण केले जाणार आहे. मागील पाच वर्षांपूर्वी क्षयरुग्ण असलेले व बीएमआय १८ पेक्षा कमी असलेले, धूम्रपान करणारे, मधुमेह असणाऱ्या सर्व ६० वर्षांपुढील सर्व व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. कुळमेथे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT