जुन्नर, ता.६ : आदिवासी भागात परतीच्या पावसाने भातखाचरातून पाणी वाहत आहे. याकाळात आदिवासी शेतकरी भात खाचरातील छोटे मासे पकडण्यासाठी बांबूपासून बनवलेले ‘भोताड’ नावाचे साधन वापरून मुऱ्हे व चुचणी मासे असे छोटे मासे पकडतात.
भात खाचराच्या सांडीवर हे जुगाड लावल्यानंतर खाचरातील पाणी उताराकडे वाहत जात असताना या भोताडात मासे अडकतात. हे छोटे मासे अत्यंत चविष्ट असतात. याकाळात ओढे, नाले, तळे व शेतात चिबोरी खेकडे देखील मिळतात. त्यांचा आदिवासी शेतकरी आहारात मोठ्या प्रमाणात वापर करतात. विशेषतः ठाकर व कातकरी समाज मोठ्या प्रमाणात खेकडे पकडतात.
मूऱ्हे माशांचे जीवनचक्र
सर्वसाधारणपणे पाऊस सुरू झाला की ओढे, नाले वाहू लागतात. यावेळी नदीतील डोह तसेच धरणातील काही मूऱ्हे मासे वाहत्या पाण्याबरोबर भात खाचरातील गाळाला लपेटून वर्षभर जमिनीच्या पोटात तसेच रानावनांतील खोल कुंडात राहतात. अंडी घालण्यासाठी ते जमिनीच्या दिशेने वर, वर चढत राहतात. त्याला ‘माशांची चढण’ असे म्हणतात. मासे भात खाचरात येऊन अंडी घालतात. दरम्यानच्या काळात खाचरात अंड्यातून माशांची पैदास होते. हेच छोटे मासे परतीच्या पावसात परतीचा प्रवास सुरू करतात. म्हणजेच नदी, नाले, डोहाकडे जातात व तेथे स्थिर होतात. माशांचे हे जीवनचक्र असल्याचे शेतकरी तान्हाजी तळपे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.