जुन्नर, ता. ४ : स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्नर पथकाने दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील एकूण सहा मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.
रवींद्र नारायण गांगड (वय १८), कैलास हारकू मधे (वय १९, दोघेही रा. वाघवडी, ता. पारनेर, जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी नारायणगाव- मांजरवाडी (ता. जुन्नर) परिसरात नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून फिरत असताना त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले. ते वापरत असलेली मोटार सायकल चोरीची असल्याचे त्यांनी कबूल केले. नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर व घोडेगाव पोलिस ठाण्यातील चार चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल त्यांच्याकडे मिळून आल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, आकाश खंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.