जुन्नर, ता. ५ : जुन्नर तालुक्याच्या विविध भागांतून नाणेघाटमार्गे जाणाऱ्या ‘महापारेषण’च्या चंद्रपूर ते पडघा ट्रान्समिशन लाइनच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यात नियमित ड्रोन पेट्रोलिंग करण्यात येणार असून नियमित देखरेखीसाठी ड्रोन उडवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे महापारेषणच्यावतीने जुन्नर पोलिसांना पत्र पाठविले आहे, असे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले. ड्रोन पेट्रोलिंगची वेळ सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहणार आहे. ट्रान्समिशन टॉवरच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीच्या कार्यक्षमतेसाठी असलेल्या स्थितीवर लक्ष ठेवणे, हा ड्रोन पेट्रोलिंग उद्देश आहे. ड्रोन उड्डाणासाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन करण्यात येईल, तसेच यामुळे स्थानिक नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र खराडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट (एचव्हीडीसी) या तत्त्वावर ५०० के. व्ही. क्षमतेचा आणि एक हजार ५०० मेगावॉट विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या राज्यातील एकमेव टॉवरलाइनचे दोष शोधून तांत्रिक दुरुस्तीसाठी महागडे, असे ड्रोन वापरात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.