पुणे

विजेच्या धक्क्यामुळे बिबट्या ठोकतो धूम

CD

जुन्नर, ता.२ : शेतकऱ्यांना वनविभागाच्या सौर कुंपण योजनेचा  लाभ होत असून, बिबट्या सौर कुंपणामुळे आता घराजवळही फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांकडून वनविभागास सांगण्यात येत आहे. सौर कुंपणामुळे बिबट्याला हलक्या स्वरूपाचा करंट लागून सायरन वाजतो व यामुळे बिबट्या तेथून पळून जातो. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जुन्नर वनविभागाकडून बिबट्यांकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यातील सौर कुंपण योजना अत्यंत प्रभावी उपाययोजना ठरली आहे. सध्या जुन्नर व शिरूर तालुक्यात अनुक्रमे सहा व चार शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण करण्यात आले आहे.
सौर कुंपण केल्यापासून बिबट्या घराकडे अद्याप एकदाही फिरकला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

पुढील काळात शेतकऱ्यांना सौर कुंपण दिले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक कोटी ५० लाख रुपये निधीस  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रति लाभार्थी २२ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण ६६० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

घराभोवतीचा सुमारे अर्धा एकर परिसर सौर कुंपणाद्वारे बंदिस्त करता येणार आहे. एका सौर कुंपणासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. यापैकी शासन ७५ टक्के खर्च करणार असून २५ टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याने करायचा आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही नावीन्यपूर्ण योजना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.


शासन करणार ७५ टक्के खर्च
आतापर्यंत लाभार्थी हिश्श्याची प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये रक्कम भरलेल्या जुन्नर व शिरूरमधील एकूण दहा शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. सौर कुंपणामुळे एका घराभोवतीचा साधारण अर्धा एकर परिसर नियंत्रित करता येणार आहे.एका सौर कुंपणासाठी ३० हजार रुपये खर्च येतो.यापैकी शासन ७५ टक्के खर्च करणार असून २५ टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याने करायचा आहे.


बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी सौर कुंपण अत्यंत प्रभावशाली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या घराला सौर कुंपण केले आहे त्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. अतिसंवेदनशील भागातील बिबट हल्ल्याचा संभाव्य धोका आणि जीवितहानी टाळण्यासाठी एकांतात असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे कुंपण तातडीने करून घेणे आवश्यक आहे.
-अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर.

बिबट्याने आमच्या घराजवळ येऊन आमच्या पाळीव कुत्र्यांना ठार केले आहे. सौर कुंपणाचा करंट लागल्यापासून बिबट्या पुन्हा आमच्या घराकडे आला नाही. इतर वन्यजीवांपासून देखील या सौर कुंपणामुळे संरक्षण होत आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील हे सौर कुंपण करून घ्यावे.
- सागर मोरे, शेतकरी, शिरोली खुर्द, ता.जुन्नर.

जुन्नर वनविभागाने केलेली शेतकऱ्यांची निवड
जुन्नर......४००
शिरूर......२००
आंबेगाव ..... ६०

07848

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती? पाहा ताजे रेट

Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

गोविंदा कोमल रानीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला, नेटकरी चिडले! 'सुनीताजींना आणायला हवं होतं'

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

SCROLL FOR NEXT