पुणे

शिवनेरी मॅरेथॉनमध्ये चार हजार धावपटूंचा सहभाग

CD

जुन्नर, ता. १६ : ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या उत्स्फूर्त जयघोषात पडणारी पावलं... डीला ढोल-ताशांचा गजर... झुंबाचा कहर आणि धावपटूंचा बहर... अशा चैतन्यमय वातावरणात सुमारे चार हजार धावपटूंच्या सहभागात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजयंती उत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित शिवनेरी मॅरेथॉन पार पडली. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे येथील डॉक्टर, पोलिस व व्यापारी धावपटूंचा सहभाग लक्षणीय होता.
या मॅरेथॉनमध्ये २१.१ किलोमीटर पुरुष गटात साहिल बिबवे (१ तास २२ मिनिटे),  तर महिला गटात प्रेरणा ठोसर (२ तास १ मिनिट) यांनी  प्रथम क्रमांक पटकावला. १० किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात नवनाथ बाचकर (३५ मिनिटे ३१ सेकंद), तर महिला गटात अंजली देवडे (४६ मिनिटे ४५) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पर्यटन विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिवनेरी मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अतुल बेनके, विशेष पोलिस महासंचालक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर राज्यकर आयुक्त संजीव सैद पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
दरवर्षी शिवजयंतीच्या आदल्या रविवारी शिवनेरी ट्रेकर्समार्फत विविध स्थानिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी निसर्गरम्य हवामानात, दुतर्फा मशालींच्या प्रकाशात व खास जुंद्री पाहुणचारात धावणे ही एक पर्वणी असते. तज्ज्ञ फिजिओथेरपीस्ट डॉक्टरांचे पथक, आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिका, प्रत्येक सव्वा किलोमीटरवर प्रथमोपचार व आरोग्य पथके, दर अडीच किलोमीटर अंतरावर फिरती शौचालये आदी सुविधांसह स्पर्धा मार्ग सुसज्ज असतो.

मान्यवरांचा झुंबा व संबळ डान्स
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेत धावपटूंचा उत्साह वाढवत झुंबा मैदान गाजवले. माजी आमदार अतुल बेनके, विशेष पोलिस महासंचालक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पाच किलोमीटर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत धावपटूंना प्रोत्साहन दिले. यासोबतच ढोल लेझीम व संबळच्या तालावरही हे मान्यवर मुक्तपणे थिरकले. आयर्नमॅन दशरथ जाधव, मंगेश कोल्हे, डॉ. सागर गुजराथी, डॉ. अमोल डुंबरे तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये धाव घेतली.    

जुंद्री पाहुणचाराने धावपटू भारावले
मॅरेथॉन व तत्सम धावण्याच्या स्पर्धा मोठ्या शहरांमध्ये होत असताना जुन्नरमधील तरुणांमार्फत दुर्गम ग्रामिण भागात सेवाभावीपणे मॅरेथॉनची ही लोकचळवळ उभारण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. मल्टीग्रेन दलिया, थेट शेतातील ताजी द्राक्ष, केळी, संत्रा, स्ट्रॉबेरी, चिक्की आदी उर्जावर्धक खाद्यपदार्थांनी मॅरेथॉनची गोडी वाढवली. मॅरेथॉन मार्गावरील कुसूर, वडज, काटेडे व येणेरे येथील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थांनी पारंपरिक गणवेश व वाद्यांच्या गजरात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत दिलेल्या प्रोत्साहनाने धावपटू भारावून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT