पुणे

कृषी सहाय्यकांचा आजपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप

CD

जुन्नर, ता. १४ : महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकारलेल्या आंदोलनात जुन्नर तालुक्यातील कृषी सहाय्यक सहभागी असून संघटनेच्या आदेशानुसार १५ मेपासून बेमुदत संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती जुन्नर तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्ष राजश्री नरवडे यांनी दिली.
बेल्हे, नारायणगाव, जुन्नर व ओतूर या चारही मंडल विभागातील ४८ कृषी सहाय्यकांनी पाच मे रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत कामकाज केले. दरम्यान,
त्यांनी नऊ मेपासून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकला. मात्र, प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांना नुकतेच देण्यात आले, असे नरवडे यांनी सांगितले.

कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे. कामकाजासाठी लॅपटॉप मिळावा. कृषी विभागाचा आकृतीबंधास तत्काळ मंजुरी द्यावी, आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
बेमुदत काम बंद आंदोलनात सचिन जुंदरे सचिव,मनीषा ठोंबरे, भगवान पोटे, दत्ता मडके, नीलम काठे, प्रतिभा अडागळे, कावेरी गाडेकर, सीमा गाडेकर, संध्या बोकड आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : निष्ठावान विकले जाऊ शकत नाहीत; उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले लक्ष्य

IND vs ENG 5th Test: सर रवींद्र जडेजाने इतिहास रचला! एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम केला; जगातील दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Kamlesh Rai: खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला रंगेहाथ अटक, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा; व्हिडीओ व्हायरल

Raj Thackeray : मराठी माणसाने मराठी अस्मिता जपावी; राज ठाकरे यांचे प्रतिपादन

Sanjay Shirsat: "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT