पुणे

खताची लिंकिंग थांबविण्याची वितरकांची मागणी

CD

जुन्नर, ता.२३ : शेतकरी व विक्रेता यांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी युरिया खतासोबत इतर खताची लिंकिंग करून नये. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी वितरक प्रतिनिधीच्या वतीने मुकुल गावडे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलताना केली.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात खरीप पूर्व हंगाम आढावा बैठकीचे गुरुवारी (ता.२२) आयोजन केले होते. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी खत-औषधे विक्रेत्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
लिंकिंग खतामुळे विक्रेता मेटाकुटीला आला आहे. विक्रेत्याचे लिंकिंग बंद करावे. त्यामुळे शेतकरी व विक्रेता यांच्यात होणारे वाद विवाद दूर होतील, असे मत वितरक अजित वाजगे व राजू वामन यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रभारी तहसीलदार सारिका रासकर, प्रभारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत, मंडल कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, खते, औषधे बियाणे विक्रेते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन सादर केले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजाराम चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

‘कोल्ड स्टोरेज उभारणी प्रयत्न करणार’
उत्पादक शेतकरी, विक्रेते व अधिकारी यांची दर तीन महिन्याला आढावा बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील सर्वात जास्त भाजीपाला,फळे व फूल शेती पिकविणारा शेतकरी जुन्नर तालुक्यातील आहे. येथील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक माहिती केंद्र, प्रशिक्षण केंद्र असलेले महाराष्ट्रातील सर्वोत्तम शेतकरी भवन बांधणार आहे. अन्नधान्य,भाजीपाला, फळपिके आदी नाशवंत शेतमाल ठेवण्यासाठी मेगा फूड पार्क, जैविक निविष्ठा केंद्र उभारणी तसेच द्राक्षे व केळी पिकासाठी कोल्ड स्टोरेज उभारणी आदींसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

SCROLL FOR NEXT