पुणे

जुन्नरला खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण

CD

जुन्नर, ता.३० :कृषी विभागाने जुन्नर तालुक्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. जुन्नर तालुक्यासाठी एकूण ३४ हजार २१७ टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे तसेच एकूण १३ हजार ५०४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मे अखेर एकूण ७ हजार ५५२ टन खताचा पुरवठा होणे अपेक्षित आहे, अशी माहिती गुण नियंत्रण निरीक्षक तथा जुन्नर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात गुरुवारी (ता.२९) अखेर सरळ व संयुक्त खते मिळून ९ हजार ८०३ टन खतांचा साठा उपलब्ध आहे. मे अखेर सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल तसेच आजअखेर ३ हजार ५०० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे .यात खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग व मका तसेच कडधान्य या प्रमुख पिकांची बियाणे आहेत.बियाणांचा मागणीप्रमाणे पुरवठा होणार असून प्रामुख्याने महाबीज व खासगी कंपन्यामार्फत बियाण्यांचा पुरवठा केला जातो.निविष्ठांच्या उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही शेतकऱ्यांना वेळेवर मुबलक व चांगल्या दर्जाचे खते व बियाणे मिळण्यासाठी कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो असे बुधवंत यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यासाठी युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा करण्याचे नियोजन केले केलेले असून युरिया खताचा ६०० मेट्रिक टन व डीएपी ८० टन साठा बफर स्टॉक मध्ये ठेवण्याचे नियोजन केलेले आहे.

खरिपाचे प्रमुख पिकाखालील अपेक्षित पेरणी क्षेत्र(हेक्टर) पुढील : भात-१३,९९२, सोयाबीन-१४,५६०, मका-२,१२२, उडीद-५००, तूर-३७१, बाजरी-६१० व इतर पिके.
खरीप हंगामासाठी प्रमुख खतांची मागणी टनामध्ये खालीलप्रमाणे : युरिया-१४,१००, डीएपी-२,९८५, एमओपी-१,१४२, सिंगल सुपर फॉस्फेट-३,०७५, संयुक्त खाते-१२,९१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT