पुणे

पोलिस दुरक्षेत्राची इमारत गावाच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी ः बेनके

CD

जुन्नर, ता. १ : ‘‘पोलिस दुरक्षेत्राची इमारत केवळ एक वास्तू म्हणून न राहता गावाच्या कायदा- सुव्यवस्थेसाठी एक प्रभावी पायरी ठरेल. यामुळे भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल,’’ असा विश्वास माजी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला.
आदिवासी भागातील इंगळूण (ता. जुन्नर) येथील ब्रिटिशकालीन पोलिस चौकीचे पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीने नवीन इमारतीच्या कामाचे भूमीपूजन माजी आमदार बेनके यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बेनके बोलत होते. येथील ब्रिटिशकालीन पोलिस दुरक्षेत्र इमारतीची दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांची गेली अनेक वर्षांपासून पोलिस चौकीच्या इमारतीची मागणी होत होती. माजी आमदार बेनके यांनी यासाठी आपल्या कार्यकाळात ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
यावेळी डोळसवाडी ते विरणक वस्ती काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक किरण अवचर, शाखा अभियंता आगळे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, अजिंक्य घोलप यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच पुष्पा डामसे, उपसरपंच रंजना डोळस, ग्रामपंचायत सदस्य विजय डामसे, दगडू डामसे, प्रभाकर विरणक, अशोक डामसे, मालती डामसे, रंजना डोळस, नंदकुमार कोथेरे, संदीप मुंढे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक विजय डामसे यांनी, तर पोलिस पाटील अशोक डामसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, आता 'या' क्षेत्राला केले लक्ष्य; १ नोव्हेंबरपासून जगभरात होणार लागू

Supreme Court : ''क्रिकेट खेळ राहिला नाही, व्यवसाय बनलाय''; सुप्रीम कोर्टाला असं म्हणण्याची वेळ का आली?

शेतकऱ्यांसाठी १४१८ कोटींची घोषणा, पण केवायसी नसल्यानं ७४६ कोटी बँकेतच; अट रद्द करूनही जुन्या नियमानेच वाटप

Eknath Shinde: कार्तिकीला विठ्ठल पूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना; मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शेळके यांची माहिती

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

SCROLL FOR NEXT