जुन्नर, ता.१९ : आगामी निवडणुकीसाठी जुन्नर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर सोमवारी ता.१८ रोजी नागरिकांच्या माहितीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी दिली.
प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार १८ ते २१ ऑगस्ट या कालावधीत नगर परिषदेच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर हा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत काही हरकती व सूचना असल्यास नागरिकांनी कार्यालयातील आवक-जावक विभागात लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे कोल्हे यांनी कळविले आहे.
नागरिकांना त्यांच्या हरकतीवरील सुनावणीचा तपशील कळविण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.