जुन्नर, ता.२१ : जुन्नरच्या आदिवासी भागात गेले तीन दिवस झालेल्या दमदार पावसाने भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पिकाच्या ऐन फुटव्याच्या व वाढीच्या अवस्थेत भात खाचरातील पाणी जवळपास संपत आले होते. मात्र, दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडल्याने ही चिंता दूर झाली आहे.
जुन्नरमध्ये जोराच्या पावसामुळे नद्या, नाले व भातशेते दुथडी भरून वाहत आहेत. हा पाऊस भातशेतीला अत्यंत उपयुक्त आहे. या पावसामुळे शेतातील नको असलेले शेवाळ व तण वाहून जाण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आदिवासी भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. उन्हामुळे खाचरांत शिल्लक असलेल्या पाण्यात तसेच भातचुडा भोवती मोठ्या प्रमाणात शेवाळ निर्माण होत होते. भात खाचरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत होते.यामुळे भात रोपे पिवळी पडण्याची व शेतात तण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाहत्या पाण्यामुळे भातशेतात ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. याचा फायदा भातरोपांच्या वाढीला होणार आहे. यंदा पंधरा ऑगस्टपर्यंत भात लागवड सुरू होती.
आदिवासी भागात पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त वातावरण होते. यंदा सुरुवातीला उघडीप मिळाली नसल्याने भातरोपे कमी तयार झाली. त्यामुळे भात लागवड पुरेशा प्रमाणात झाली नाही. आता पावसामुळे बेनणी तसेच खते देण्याच्या कामांना गती येणार आहे.
- रावजी तळपे, प्रगतशील शेतकरी
09035
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.