पुणे

जुन्नरमधील शिबिराचा ५८७ महिलांना लाभ

CD

जुन्नर, ता. २१ : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित महिलांची आरोग्य तपासणी व विविध शासकीय योजनांचा लाभ शिबिराचा सुमारे ५८७ महिलांनी लाभ घेतला.
या शिबिरात महिलांची ऍनिमिया, रक्तदाब, मधुमेह, तसेच रक्तातील विविध तपासण्या, नेत्र व दंत रोग तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली. यावेळी दोनशे महिलांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याचबरोबर आयुष्यमान भारत व वय वंदना नावनोंदणी, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र व इतर योजनांचा लाभ देण्यात आला.
गरीब व गरजू महिलांना डिसेंट फाउंडेशनच्या एक साडी ‘ती’च्या साठी उपक्रमांतर्गत साडी व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. डिसेंट फाउंडेशन पुणे, आरोग्य व महसूल विभाग, तसेच श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले होते. विघ्नहर्ता व डोके हॉस्पिटल, श्रीकृष्ण दातांचा दवाखाना, माऊली ऑप्टिकल सेंटर, हिंद महालॅब यांचे सहकार्य लाभले.
डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे, डॉ. दयानंद गायकवाड, एफ. बी. आतार, आदिनाथ चव्हाण, संतोष आटोळे, डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड, विलास बोंद्रे, मंगेश साळवे, सपना बेलवटे, चैत्राली केंगले, श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर आदी उपस्थित होते.

09356

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT