पुणे

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस कारावास

CD

जुन्नर, ता.११ : जुन्नर न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस (ता.१०) दोषी ठरवून कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. स्वप्नील सुरेश सरजिने (रा.सरजिनेवाडी-अलदरे ता.जुन्नर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जुन्नरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. जैन यांनी आरोपीस विनयभंगाच्या आरोपाखाली एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत जुन्नर पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार तिचा नातेवाइक असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३२३ मध्ये देखील दोषी ठरवून दहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास शिक्षा सुनावली आहे.
सरजीने पीडित महिलेचा मावस दीर असून, तो नेहमी घरी जेवणासाठी येत होता. आरोपीने १४ मे २०२१ रोजी पीडित महिलेच्या बेडरूममध्ये येऊन विनयभंग केला होता. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपीने तीस घराबाहेर ओट्यावर ओढत आणून हाताने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्रभारी अधिकारी पोलिस किरण अवचर यांनी दिली. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व सरकारी वकील सीमा अवचर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीर टीम इंडियाचं प्रशिक्षक पद सोडणार? IPL संघाने दिली मोठी ऑफर...

Nashik Municipal Corporation : भाजपचे '४-३-२' सूत्र! नाशिक स्थायी समितीत नव्या दमाच्या शिलेदारांना संधी; कुंभमेळ्यापूर्वी राजकीय गणिते स्पष्ट

Latest Marathi News Live Update : अजित पवार विमान अपघात प्रकरणात रूपाली ठोंबरे आक्रमक!

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत 'महिलाराज'! स्थायी समितीच्या १६ पैकी ११ जागांवर महिलांची वर्णी

SCROLL FOR NEXT