पुणे

जुन्नरला ‘एमआयएम’ची निवडणुकीतून माघार

CD

जुन्नर, ता. १४ : जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीतून ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ ‘एआयएमआयएम’ पक्षाने माघार घेतली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक ॲड. जमीर कागदी यांनी एआयएमआयएमच्या माध्यमातून नगराध्यक्ष व काही प्रभागात उमेदवार देण्याचे जाहीर केले होते. काही प्रभागातील उमेदवारदेखील जाहीर केले होते.
दरम्यान ॲड. कागदी यांनी गुरुवारी (ता. १३) ‘एआयएमआयएम’ पक्ष नगर परिषद निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. तसेच, स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. जुन्नर शहरात मुस्लिम समाजाचे आठ ते नऊ हजार मतदार आहेत. मागील निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ पक्षाने नगराध्यक्ष व एक सदस्य पदासाठी उमेदवार उभे केले होते, मात्र समाजाकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT