पुणे

पिंपरवाडीतील नाचणी काढणीची लगबग

CD

लेण्याद्री, ता.२७ : पिंपरवाडी (ता. जुन्नर) परिसरातील नाचणीचे पीक सद्या कापणीयोग्य आणि मळणीसाठी तयार झाले आहे. त्यामुळे नाचणी काढणीची लगबग सुरू आहे. अत्यंत पौष्टिक असणाऱ्या नाचणीची खरीप हंगामात लागवड केली होती.
आरोग्याच्या दृष्टीने पूर्णान्न असलेल्या नाचणी पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी पिंपरवाडी येथे नाचणीच्या १७ प्रकारच्या बियाणांची बँक साकारण्यासाठी यावर्षी येथील शेतकऱ्यांनी नाचणीची लागवड केली होती. दुर्गम पिंपरवाडीत प्रथमच महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाचा हा प्रयोग राबविला गेला सुमारे चार एकर क्षेत्रात आठ शेतकऱ्यांनी नाचणीच्या विविध प्रजातीची लागवड केली होती, असे ग्रामसमन्वयक गणपत घोडे यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यात नाचणीचे सरासरी क्षेत्र १०९ हेक्टर इतके आहे. पिंपरवाडी येथील नाचणी बँकेमुळे भविष्यात तालुक्यातील नाचणीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
लागवड करणारे शेतकरी कंसात नाचणी प्रकार : वसंत घोडे (दसर बेंद्री, पिवळ बेंद्री), गोविंद घोडे (टी१४), गोविंद ढेंगळे (शितोळी मुटकी), रामदास घोडे (शिनपडी गरवी), नवनाथ घोडे (टी १५), पांडुरंग घोडे (जबाड स्थानिक), सखाराम घोडे (ढवळ पेरी), तुकाराम घोडे (शित मुटकी, दापोली) याचबरोबर इतरही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे स्थानिक नाचणीची लागवड केली.

09506

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT