पुणे

खळदला पीकविमाबाबत जनजागृती

CD

खळद, ता. १३ : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी खळद (ता.पुरंदर) येथे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी अमोल धुमाळ यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना या योजनेबद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.खरीप हंगाम विमा योजनेत भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी,नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा आदी पिके या योजनेत असून यापैकी पुरंदर तालुक्याचा भौगोलिक विचार करता येथे मोठ्या प्रमाणावरती घेण्यात येणाऱ्या भात,बाजरी,भुईमूग व कांदा या पिकांचा विम्याच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा, याशिवाय सीएससीच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
यावेळी सरपंच संदीप यादव,ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, रमेश कामथे, उत्तम कामथे, गणेश कामथे, शंकर कामथे, कैलास खळदकर, पंढरीनाथ रासकर, रामदास खळदकर, मारूती कामथे, हनुमंत कामथे, चंद्रकांत कामथे, नामदेव कादबाने, रामचंद्र कामथे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

03146

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : माझा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय- देशमुख

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

SCROLL FOR NEXT