पुणे

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘जीवन गौरव’

CD

खळद, ता. ६ : खळद (ता.पुरंदर) येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘एमकेसीएल’चे मुख्य संरक्षक विवेक सावंत यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कै. विलासराव साळुंखे यांनी स्थापन केलेल्या ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणी पंचायत संस्थेचा ५१ वर्षपूर्ती सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात साळुंखे यांच्या स्मरणार्थ पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या हिमांशू कुलकर्णी आणि आरोग्य क्षेत्रातील कुसुम मोडक यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर प्रशांत कुंभारकर (पाणी), कल्पना धाडवे (आरोग्य), तुषार पापळ (प्रक्रिया उद्योग) यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी किरण जाधव, विश्वस्त कल्पना साळुंखे, डॉ.सोनाली शिंदे, प्रसाद सेवेकरी, अनिल काळे तसेच परिसरातील गावांतून शेतकरी, सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सीएसआर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमानंतर पाहुण्यांच्या हस्ते जैवविविधता केंद्राचेही भूमिपूजन करण्यात आले. यावेळी

यावेळी बोलताना विवेक सावंत यांनी भारतातील सद्यःस्थिती तसेच लोकल ते ग्लोबल पातळीवर, शाश्वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. सोनाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील पुरंदर व सातारा भागातील कामांचा आढावा प्रशांत बोरावके, योगेश मगर, सागर भोंडे, वैद्य प्रज्वल झेंडे यांनी सादर केला.
प्रशांत बोरावके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
03178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Teacher: शिक्षकं देणार पूरग्रस्तासाठी एक कोटी; धाराशिव शिक्षक संघटना समन्व्य समितीचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

मोठी बातमी! पूरग्रस्तांना शासनाकडून फक्त गहू-तांदूळ अन् तूर डाळच; शासनाच्या किटमध्ये तेल, मीठ, तिखट, चहा-साखर नाहीच; ‘एनजीओ’कडून भागवाभागवी

Paneer Cashew Mayo Sandwich: सकाळच्या गडबडीत फक्त १० मिनिटांत तयार होणारं, प्रोटिनने भरलेलं पनीर-काजू मेयो सँडविच नाश्त्यासाठी आहे परफेक्ट!

३० व्या फेनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरची विजयी सुरुवात

Dussehra 2025 : पैशांच्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी यंदाच्या दसऱ्याला करा हे जालीम उपाय

SCROLL FOR NEXT