पुणे

पालखी महामार्गावर विद्युतीकरण करा

CD

खळद, ता. २५ : आळंदी- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर सासवड ते जेजुरी (ता. पुरंदर) दरम्यान रस्त्यालगतच खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर आदी गावे व यांच्या वाड्यावस्त्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडल्यावर थेट रस्त्यावर यावे लागत आहे. अशावेळी या रस्त्याच्या दुतर्फा विद्युतीकरण व्हावे, अशी मागणी या भागातील नागरिक, प्रवासी करीत आहेत.
याबाबत गावांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे, तर आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत चार ते पाच महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीतही दिलेल्या निवेदनातून हा विषय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मात्र, अद्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता रस्त्याचे काम पूर्ण झाले, रस्ता हस्तांतरित झाला तर पुन्हा हे काम होणार नाही. यामुळे येथील नागरिक अस्वस्थ झाले असून, त्यांच्या मनात आपल्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने हा रस्ता हस्तांतरित होण्यापूर्वीच या भागात विद्युतीकरण होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या रस्त्यावर पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालय, हॉटेल व्यवसाय, औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र जेजुरी, शिवरी निवासी यमाई देवी, अष्टविनायकातील श्री क्षेत्र मोरगाव येथे देवदर्शनासाठी अनेक भाविक रात्री, पहाटे या रस्त्याने प्रवास करतात. सध्या या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस अनेक अपघात होत असून, अनेक वाहने पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यापूर्वी रस्त्यालगतच खळद येथील रासकरमळा जिल्हा परिषद शाळेलाही वाहनाची धडक बसून मोठा अपघात झाला होता.

असा दुजाभाव का?
झेंडेवाडी ते नीरा या मार्गाचा विचार केला तर काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा विद्युतीकरण करण्यात आले आहे. पण सासवड- जेजुरी दरम्यान मात्र हे विद्युतीकरण केले नाही. या भागात फक्त उड्डाणपूल, टोल नाका परिसरात विद्युतीकरण झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एकाच रस्त्यावर असा दुजाभाव का करत आहे? असा प्रश्न प्रवासी, नागरिक उपस्थित करीत आहेत.

उड्डाणपुलाखाली नागरिक असुरक्षित
उड्डाणपुलाचे काम होत असताना उड्डाणपुलाच्या खाली मध्यभागी कोणतीही विद्युतीकरणाची तरतूद नसल्याचे दिसत असून, येथे रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार होत आहे. येथे अंधारात प्रवाशांना असुरक्षित वाटत असून, चोरी, लुटमारीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथे विद्युतीकरण व दोन्ही बाजूला आरसे बसवण्याची आवश्यकता आहे.

या रस्त्यावर जेजुरीपर्यंत शहरीकरण व औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात चालू असल्याने वाहतूक वाढली आहे. अशावेळी तर या रस्त्यावर अनेक ठिकाणी चढ उतार, छोटी वळणे आहेत. रस्त्यावर दुभाजक दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाश नसल्याने रस्ता दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची फसगत होत आहे. यामुळे छोटे- मोठे अपघात होत आहेत. भविष्यात यामध्ये वाढ होऊ शकते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर सरसकट दुतर्फा विद्युतीकरण व्हावे.
- नवनीत कादबाने, रहिवासी, खळद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Schemes: बिहारमध्ये NDAच्या कल्याणकारी योजनांचा मास्टरस्ट्रोक? १,२ नाही तर 'इतक्या' योजना सुरू, ग्रामीण मतदारांची मतं वळवली!

Vastu Tips For God Hanuman Photo: हनुमानजींचा फोटो घरात कोणत्या दिशेला लावावा? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Latest Live Update News Marathi: निवडणुकीचा फॉर्म सतरा पानांचा; प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांची उडाली झोप

Kolhapur News: कोल्हापूरची लोकसंख्या वर्षभरात २६ हजारांनी वाढली; १६ वर्षांनंतरच्या जनगणनेची प्रतीक्षा अखेर संपली!

Dhayari News : धायरीत अंगणवाडी इमारत जीर्णावस्थेत, भिंतींना तडे, छताचे पत्रे गंजलेले; मुलांचे भविष्यच धोक्यात

SCROLL FOR NEXT