खळद, ता. २९ : बेलसर-साकुर्डे (ता. पुरंदर) येथील कदमवस्ती जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा व अध्यक्ष चषक स्पर्धेत पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल पालक मेळावा, बालआनंद मेळावा व मुख्याध्यापक अनंत जाधव, सहशिक्षिका सुरेखा जाधव या शिक्षक दांपत्यांचा सन्मान सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या हस्ते जेजुरी येथील मल्हार नाट्यगृह येथे पार पडला.
यावेळी नाईकडे म्हणाले की, ‘‘जीवनात पद, पैसा मिळेल पण संस्कारक्षम मुलगा मिळणार नाही. संस्कार हीच मुलांच्या आयुष्याची खरी शिदोरी असून प्रत्येक मुलाकडे ही शिदोरी असावी. यासाठी चारित्र्यसंपन्न, संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे ही पालकांची व शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे.’’
याप्रसंगी योजना शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे, बी. एम. काळे, विस्तार अधिकारी राजेंद्र कुंजीर, ऋषिकेश कदम, संपत गरुड, अर्जुन धेंडे, धीरज जगताप, संदीप कदम, श्रीकांत कदम, बबन कदम आदी उपस्थित होते. बी. एम. काळे यांनी प्रास्ताविक, तर प्रा.संदीप टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश गरुड यांनी आभार मानले.
आई-वडील शाळेसाठी अहोरात्र काम करतात, अगदी रात्रही त्यांचे ऑनलाइन तास असतात. यातून शक्य तेवढा वेळ आम्हालाही देतात पण ते नेहमी सांगतात शासनाकडून आपल्याला जो पगार मिळतो, त्यातील प्रत्येक पैसा हा या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असून तेवढा वेळ आपण त्यांच्यासाठी दिला पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत आणि कष्टाशिवाय यश नाही व याच दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल सुरू असल्याने सुरुवातीला आतकरवाडी व आता कदमवस्ती या शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याचा त्यांची मुले म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
- डॉ. क्षितिजा जाधव, जाधव शिक्षक दांपत्याची मुलगी.
KAA25B03213
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.