कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम
पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि संवेदनशीलतेचा वस्तुपाठ असलेले संजयजी चंदुकाका जगताप यांचा आज १५ जानेवारी रोजी वाढदिवस. या निमित्ताने पुरंदर- हवेलीतील सर्वसामान्य जनतेच्या वतीने त्यांना आरोग्यमय, दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- गणेश सुरेश खळदकर, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत खळद
सामाजिक भान, सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले नेतृत्व आणि संकटात धीर देणारी माणुसकी हे गुण पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी जगताप यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. शेतकरी, कष्टकरी, वंचित, पीडित आणि गोरगरिबांच्या दुःखाशी एकरूप होत, ‘काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे’ असा विश्वास देणारे हे नेतृत्व केवळ शब्दांत नव्हे; तर कृतीतून सतत दिसून आले आहे. अन्यायाविरुद्ध कडाडून उभे राहणे, दुबळ्यांना बळ देणे आणि माणसांमधील माणुसकी जपणे, ही त्यांची ओळख बनली आहे.
वडिलांचा वसा, विकासाचा वारसा
सहकार व शिक्षणमहर्षी स्व. नामदार चंदुकाका जगताप यांच्या सामाजिक, राजकीय, कृषी आणि सहकार क्षेत्रातील विचारांचा वसा घेऊन संजयजी जगताप यांनी पुरंदर- हवेलीच्या भूमीत दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व उभे केले. सकारात्मक विचार, अभ्यासपूर्ण भूमिका आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यात विकासाचा नवा आशावाद निर्माण केला. समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधत सातत्याने पाठपुरावा करणारी त्यांची कार्यशैली सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरली आहे.
संकटातही आधारवड
कोरोनासारखे अभूतपूर्व संकट, अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळी परिस्थिती, प्रत्येक संकटाच्या काळात संजयजी जगताप यांनी अहोरात्र काम करत प्रभावी नियोजन केले. याच काळात ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा मा. राजवर्धिनीताई संजयजी जगताप यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले सहकार्य आणि मदत जनतेसाठी मोठा आधार ठरला. या संकटातून जनतेचा विश्वास आणि निर्णय खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याचे चित्र सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
विकासाची संवेदनशील वाटचाल
पुरंदर- हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक भागातील परिस्थितीचा सखोल अभ्यास, स्थानिक प्रश्नांची समज आणि त्यावर शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धतीमुळे त्यांच्या विकासकामांचे सर्वत्र स्वागत झाले. शेतकरी, युवक, रोजगार, उद्योग- व्यवसाय यांना चालना देताना त्यांनी दिलेली माणुसकीची जोड लोकांच्या मनात आपुलकीचे नाते घट्ट करणारी ठरली. त्यांच्या नेतृत्वामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास आज जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
युवकांचा मार्गदर्शक
‘तुम्ही एकटे नाहीत, मी तुमच्यासोबत आहे’ हा विश्वास देत युवकांना उभारी देणारे संजयजी जगताप संयम, नियोजन आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देतात. उद्योग- व्यवसायाच्या संधी, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य यामुळे युवकांच्या प्रगतीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. इतरांनाही पुढे नेण्याची प्रेरणा देणारे हे नेतृत्व समाजाला सकारात्मक दिशा देणारे आहे.
लोकसेवकाची भूमिका
आमदारपदाच्या कार्यकाळात स्वतःला लोकसेवक म्हणून संबोधत त्यांनी शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांसाठी मोठी स्वप्ने पाहिली. कोरोनाच्या संकटातही विकासाचा आराखडा तयार करून तालुक्याच्या प्रगतीसाठी ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आला. पुढील काळात त्याची अंमलबजावणी करून तालुक्याचा विकास हेच एकमेव ध्येय असल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे.
विकासासाठी सत्तेचा सकारात्मक वापर
तालुक्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सत्तेची गरज आहे, या वास्तव भूमिकेतून संजयजी जगताप यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करून विकासासाठी अधिक निधी आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सासवड नगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिली आणि त्यातून प्रथमच नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले. निवडणुकीनंतर तात्काळ सुरू झालेली विकासकामे ही ‘निवडणूक मतासाठी नव्हे, लोकसेवेसाठी’ या त्यांच्या विचारांची साक्ष देतात.
प्रेरणादायी नेतृत्वाला मानाचा मुजरा
पुरंदर- हवेलीच्या पावन भूमीत सर्वसामान्यांच्या हितासाठी, त्यांच्या न्यायहक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे कुशल नेतृत्व माजी आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मानाचा मुजरा. आपण शतायुषी व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.