पुणे

विवाह सोहळ्यात रुजतेय ‘स्टेज संस्कृती’

CD

खळद, ता. २५ : सध्या विवाहसोहळ्यांमध्ये ‘स्टेज संस्कृती’ नावाची नवी पद्धत वेगाने रूढ होताना दिसत आहे. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत ‘आपण आवर्जून या’ अशी नम्र विनंती केली जाते. मात्र प्रत्यक्ष सोहळ्यात काही निवडक श्रीमंत, राजकीय वा सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तींनाच स्टेजवरून नावानिशी घोषणा करून विशेष सत्कार करण्यात येतो. उर्वरित नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव मात्र शांतपणे बसून हा सोहळा पाहत राहतात. त्यामुळे ही ‘स्वागत संस्कृती’ की इतर उपस्थितांचा सूचक अपमान, असा प्रश्‍न सर्वसामान्य वऱ्हाड्यांमध्ये उपस्थित होत आहे.
‘‘लग्नसमारंभात प्रतिष्ठा वाढवायची असेल, तर ती मान्यवरांच्या नावांनी नव्हे; तर सर्व उपस्थितांच्या समान सन्मानातूनच वाढते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल,’’ अशी भावना वऱ्हाडी लोकांकडून व्यक्त होत आहे.
विवाह सोहळ्यातील सत्कार प्रसंगाला इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे की, प्रमुख मान्यवरांची नामावली जाहीर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करून व्यावसायिक निवेदक बोलावले जातात. निवेदकांकडून मान्यवरांचे नाव घेताना उपमा-विशेषणांचा वर्षाव केला जातो. त्यामुळे इतर उपस्थितांचे योगदान आणि उपस्थिती गौण ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वेळात वेळ काढून, दूरवरून प्रवास करून लग्नाला हजेरी लावणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांचे मोल कमी आहे का? स्टेजवर नाव घेतले जाणारेच ‘प्रतिष्ठित’ आणि बाकी सर्व ‘सामान्य’ अशी नकळत विभागणी होत नाही ना? परिणामी, लग्नाला आलेल्या इतर पाहुण्यांची भूमिका केवळ प्रेक्षकांपुरती मर्यादित राहते. निमंत्रण स्वीकारून वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व समाजबांधव सोहळ्याचे मानकरी नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विवाह हा दिखाऊ प्रतिष्ठेचा नव्हे, तर आपुलकी आणि समानतेचा सोहळा असावा. प्रारंभी उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे एकत्रित स्वागत करून, कोणताही भेदभाव न करता नियोजित वेळेत विधी पार पाडणे हीच खरी परंपरा ठरावी.
- किरण मोडक, ग्रामस्थ मावडी पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

Mughal Empire: 'या' मुघल सम्राटाने केली होती साम्राज्य संपण्याची भविष्यवाणी; नेमकं काय म्हटलं होतं?

Latest Marathi News Live Update : मालवण वायंगणी येथील शिक्षिकेचा मृतदेह खाडी किनारी संशयास्पद आढळला

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT