पुणे

राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची गुरुवारी निवडणूक

CD

कडूस, ता. १८ : राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल तांबे व उपाध्यक्ष दत्ता भेगडे यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी गुरुवारी (ता. २२) निवडणूक होणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
राजगुरुनगर बँकेची सहा महिन्यांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर राहुल तांबे व दत्ता भेगडे यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली  होती.इतरांना संधी मिळावी, यासाठी आपापसांत ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या दोघांनीही राजीनामे दिल्याची चर्चा आहे. रिक्त झालेल्या पदांच्या निवड प्रक्रियेसाठी २२ जूनला संचालक मंडळाची विशेष सभा होणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी ही सभा बोलावली आहे.
राजगुरुनगर सहकारी बँक पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे. बँकेचे ३५ हजारांवर सभासद असून, बँकेने सव्वादोन हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ तालुक्यांसह भोसरी, पुणे शहरात बँकेचा मोठा ग्राहकवर्ग आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात बँकेच्या अध्यक्षपदाबाबत उत्सुकता असते. यावेळी सुद्धा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. बँकेचा विस्तार करण्याचे, एनपीए कमी करण्याचे आणि निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आव्हाने नव्या अध्यक्षांसमोर असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT