पुणे

शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा

CD

कडूस, ता. १८ : कडूस (ता.खेड) येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्यातील पाणी साठा वेगाने कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच बंधाऱ्यातील पाणी साठा निम्म्यावर आला आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.
कडूस येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता २.२५ दशलक्ष घनमीटर आहे. कडूस परिसरातील शेतीच्या पाण्याचा हा एकमेव आधार आहे. बंधाऱ्यातील पाण्यामुळे परिसरातील विहिरीतील पाणी पातळीवर सुद्धा परिणाम होत आहे. बंधाऱ्यातून छोट्या मोठ्या साधारणपणे दोनशे विद्युत पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसले जाते. अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पाणी उपसा योजना सुद्धा कार्यान्वित आहेत. पाटबंधारे खात्याच्या मार्गदर्शनाखाली गावातील भैरवनाथ पाणी वाटप सहकारी संस्था पाणी वाटपावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. बंधाऱ्याच्या कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात येते, परंतु पाणी वाटप संस्थेला पाण्याच्या नियोजनाबाबत तांत्रिक व गणितीय पद्धतीची माहितीच नाही.

उन्हाळ्याचे चार महिने कठीण जाणार
बंधाऱ्यातील पाणी साठा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच निम्मा झाला आहे. अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे. उन्हाळ्यातील चार महिने बाकी असताना कमी होत चाललेला पाणी साठा शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांसमोर सुद्धा दुसरा पर्याय नसल्याने शेतीसाठी उपसा होत आहे. यामुळे बंधाऱ्यातील पाणी साठा वेगाने खाली चालला आहे. परिसरातील पशुपालक, दूधउत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचे चार महिने कठीण जाणार आहेत. चारा पिके जगविण्यासाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.

01583

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT