कडूस : कडूस (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्त महिला सक्षमीकरणाबाबत गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली, तसेच महिलांना कायदेविषयक मार्गदर्शनासह महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
कडूस ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात पालवी सामाजिक संस्थेसह गावातील विविध बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या आवारात महिला जमा झाल्या. भैरवनाथ मंदिरापासून महिला सक्षमीकरणाबाबत गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. सरपंच हेमलता खळदकर, पालवी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुरेखा कड, उपाध्यक्षा सविता फापाळे, उपसरपंच रंजना पानमंद, माजी सरपंच वैशाली काळोखे, ग्रामपंचायत सदस्या लता ढमाले, बचत गटांच्या समन्वयक रेखा गारगोटे, छाया कड, सुलभा चिपाडे, ज्योती जाधव, सविता गारगोटे, आशा ढमाले व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी ठिकठिकाणी प्रात्यक्षिके सादर केली. विठ्ठल-रुखमाई व डोक्यावर कलश घेतलेल्या वारकरी महिलेचा पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी या फेरीचे मुख्य आकर्षण ठरली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर फेरीचा समारोप झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन झाले. ॲड. संदीप घुले व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. देविदास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. माजी उपसरपंच कैलास मुसळे यांनी महिला सक्षमीकरण व आत्मनिर्भरता यावर महिलांशी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने महिलांची आरोग्य तपासणी केली. महिला दिनाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश घनवट, सरपंच हेमलता खळदकर, पालवी सामाजिक संस्थेच्या सुरेखा कड यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.