पुणे

खेडमधील वनसंपदेला वणव्यांचे ग्रहण

CD

कडूस, ता. १८ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वनसंपदेला आगीचे ग्रहण लागले आहे. तालुक्यातील डोंगररांगा वणव्याच्या आगीत जळून काळ्याठिक्कर पडू लागल्या आहेत.
वेताळे, कहू कोयाळीचा डोंगर सोमवारी (ता.१७) रात्री जळाला तर मंगळवारी किवळे कडूसचा डोंगर जळत होता. आगीच्या वणव्यात वनक्षेत्र खाक होत असताना वनसंपदेची मोठी हानी होत आहे. सध्या तालुक्यातील एक एक डोंगर वणव्यांमुळे जळून काळाठिक्कर पडत आहे. वन्यजीवांचा निवाराही नष्ट होत आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला निसर्गाची अनमोल देणगी लाभली आहे. हिरव्यागार झाडाझुडपांनी नटलेल्या डोंगररांगा आगीत भस्मसात होत आहेत. चासकमान धरण जलशयाच्या दोन्ही बाजूंच्या डोंगररांगा, वेताळे, सायगाव, साबुर्डी, साकुर्डी, कहू-कोयाळी, कडूस, किवळे गावांच्या लगतचे डोंगर वणव्यात जळून गेले आहेत.

वणव्याच्या हे तोय नष्ट
१. लहानमोठे कीटक
२. सरपटणारे प्राणी,
३. पक्षी, त्यांची घरटी, अंडी

प्रभावी योजनांबाबत वनविभाग अपयशी
पावसाळा व हिवाळ्यात हिरवाईने नटलेल्या या डोंगररांगा उन्हाळ्यात मात्र भकास दिसत आहे. वनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी जंगलाला लावल्या जात असलेल्या आगींच्या घटनांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याच्या जनजागृती व प्रभावी उपाययोजनेबाबत वनविभाग मात्र अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी व वेळेत जाळपट्टे काढायला हवेत, परंतु यंदाच्या वर्षी जाळपट्टे काढलेले दिसून येत नाहीत.

यामुळे वनांची होतीय हानी
१. आग न लावण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी
२. वनकर्मचाऱ्यांचा लोकांशी संपर्क कमी झाला आहे.
३. कार्यक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.
४. विशिष्ट नागरिकांशी वर्षानुवर्षांचा संपर्क वगळता अन्य लोकांशी संवाद वाढविण्याकडे दुर्लक्ष
५. आगीच्या घटनेप्रसंगी स्थानिकांचे सहकार्य व मदत मिळविण्यात वनकर्मचाऱ्यांना अपयश

खेड मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे डोंगर आहेत. शेताचे बांध अथवा मालकी हक्कात आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. उन्हाळ्यात जाळल्यावर पुढच्या वर्षी गवत चांगले उगवते, असा लोकांमध्ये गैरसमज आहे. तो दूर केला पाहिजे. गावागावात वन कर्मचारी आग न लावण्याबाबत जनजागृती करीत आहेत. प्रचार प्रसिद्धी करीत आहेत.
- यादव जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगुरुनगर

-----------------------------------------------
01639, 01638
छायाचित्र क्रमांक - kad 18p1

kad 18p2

२) सोमवारी रात्री जळत असलेला कहू कोयाळीचा डोंगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

SCROLL FOR NEXT