पुणे

मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर फुलविले कलिंगडाचे पीक

CD

कडूस, ता. १० : कडूस-टोकेवाडी (ता.खेड) येथील युवा शेतकरी अरुण पोपट शिंदे यांनी दीड एकर क्षेत्रावर कलिंगडाचे पीक फुलविले. मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याने एकरी सुमारे २५ टन उत्पादन मिळविले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत नावीन्यपूर्ण पीक घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. आधुनिक सिंचन तंत्र, मल्चिंग पेपर आणि खते व्यवस्थापनाच्या उपयोगाने त्यांना आपले उत्पादन यशस्वीपणे वाढवले. मेहनत, पिकाची योग्य निवड, कामाचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकऱ्यांना उत्तम नफा मिळवता येऊ शकतो, हे मात्र त्यांनी दाखवून दिले. नावीन्यपूर्ण पीक प्रयोगातून त्यांनी मिळवलेला नफा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरला आहे.

विकेत ते पिकेले या न्यायाने अरुण याने पारंपरिक पिकांना छेद देत कलिंगडाची निवड केली.

अशी केली लागवड
१. ट्रॅक्टरने शेतीची मशागत केली.
२. शेणखत टाकून साडे चार फुटाच्या अंतराचे बेड तयार केले.
३. बेडवर ठिबक सिंचनचे पाइप टाकले. त्यावर सिल्वर मल्चिंग पेपर अंथरला.
४. सिम्बा जातीची लागवडी योग्य तयार रोपांची लागवड
५. जमिनीचे तापमान आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवली
६.मल्चिंग पेपरमुळे तणावर नियंत्रण राखले.
७. खते आणि किडीवरही नियंत्रण राखण्यात मदत झाली.

कलिंगडाचे वजन पाच किलो
अरुण शिंदे यांनी चांगल्या उत्पादनासाठी जैविक खतांचा वापर केला. लागवडीनंतर पाचव्याच दिवशी पाण्यातून खताचा पहिला डोस दिला. त्यानंतर दर पाच दिवसांनी पाण्यातून खतांची मात्रा दिली. कीटकनाशकाची वेळच्यावेळी फवारणी केली. यामुळे कलिंगडाच्या वेलीला सरासरी तीन ते पाच किलो वजनापर्यंत कलिंगडे लगडली.

मशागत, खते, औषधे, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा प्रतिएकरी सुमारे ८० हजार रुपये खर्च झाला. परंतु ६५ दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर उत्पन्नातून चांगले फळ मिळाले. कलिंगडाला प्रतिकिलो नऊ रुपयांपासून तेरा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसा अपेक्षेपेक्षा बाजारभाव कमीच मिळाला. पारंपरिक पिकांपेक्षा कलिंगडाच्या पिकाने बऱ्यापैकी आर्थिक नफा मिळवून दिला.
- अरुण शिंदे, युवा शेतकरी

३८ ते ४० टन उत्पादन अपेक्षित
मेहनतीचा परिणाम म्हणून त्यांनी ६० दिवसांच्या कालावधीत कलिंगडाचे प्रतिएकरी जवळपास २५ टन उत्पादन घेतले आहे. सध्या फक्त एक एकर क्षेत्रावरील कलिंगडाची तोड सुरू आहे. अजून अर्धा एकर क्षेत्रावरील तोडीला काही दिवसांचा अवकाश आहे. दीड एकरातून त्यांना ३८ ते ४० टन उत्पादन अपेक्षित आहे.

01677

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा हवालदार यांच्या हस्ताक्षर-स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी होणार

SCROLL FOR NEXT