पुणे

‘प्लांटिक्स ॲप’बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

CD

कडूस, ता. ६ : मोबाईलमध्ये काढलेल्या छायाचित्रावरून पिकावर पडलेल्या रोगाबद्दल अचूक माहिती व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणाऱ्या ‘प्लांटिक्स ॲप’ व त्याच्या वापराबद्दल सातकरस्थळ (ता.खेड) येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. आंबी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी कार्यानुभव अभ्यासक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हे अॅप पिकावरील रोग, कीड किंवा पिकातील कमतरता ओळखते आणि त्यावर काय उपाययोजना करायची, याबद्दल मार्गदर्शन करते.  शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या या ॲपबद्दल आंबी येथील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कृषिकन्या गौरी कदम, सोनाली चिकमणी, शिवानी कोळी, अपर्णा मेश्राम, संजना जगताप यांनी सातकरस्थळ येथील शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी माजी सरपंच अजय चव्हाण, सरपंच रुतीका सातकर, उपसरपंच स्वाती सातकर, ग्रामपंचायत अधिकारी नीलेश पांडे व शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, अगोदर या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन बीजप्रक्रिया, बियाण्याचे अंकुरण, सेंद्रिय खत तयार करणे आदी प्रकाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI Rankings: ३९ वर्षीय खेळाडू झाला 'नंबर वन' ऑलराऊंडर; टॉप-१० मध्ये केवळ एकच भारतीय

Latest Maharashtra News Updates : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

ChatGpt Down Meme: चॅटजीपीटी डाऊन झाल्याने सोशल मिडियावर मीम्सचा महापूर, पाहा भन्नाट मीम्स

Viral Video : अवघ्या ७ सेकंदांत त्याला मृत्यूने गाठलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली हृदयद्रावक घटना

Manoj Jarange: सरकारच्या GR ला विरोध करणारे मराठे कोण? मनोज जरांगेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT