पुणे

रस्ता रुंदीकरणासाठी १५० झाडांची कत्तल

CD

कडूस, ता. ८ : कडूस ते राजगुरुनगर (ता. खेड) या दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी वृक्षांची तोड सुरू आहे. यात लहान मोठी सुमारे १५० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यात दोंदे व वडगाव पाटोळे गावच्या शिवेवरील सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुने डेरेदार चिंचेचे झाड बुंध्यापासून तोडले आहे.
या जुन्या चिंचेचा वृक्षाबाबत परिसरातील नागरिकांच्या मनात असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. डॉ. राजेश बनकर म्हणाले की, दोंदे गावावरून तालुक्याच्या गावी म्हणजेच राजगुरुनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावच्या शिवेवर उजव्या बाजूस उभे असलेले ते चिंचेचे झाड, आमच्या बोलीभाषेत ‘शिवची चिंच’ म्हणून ओळखलं जात होते. रस्ता काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाच्या कामात कापले गेले, त्याचे तुटून पडलेलं भले मोठे खोड, बुंधा हे पाहताना मनात एक हळवी पोकळी दाटून आली. विकासासाठी अशा कितीतरी पारंपरिक आठवणींच्या खुणा नामशेष होताना आपण पाहतो. मनाला अतीव दुःख होते, पण विकासाच्या नावाखाली नाइलाजाने दुःख पचवावं लागतंय, असे त्यांनी नमूद केले.

2098

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT