पुणे

गारगोटवाडीत धावले ६०० बैलगाडे

CD

कडूस, ता. १३ ः गारगोटवाडी (ता. खेड) येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत तीन दिवसांत एकूण ६०० बैलगाडे धावले. यात पहिल्या दिवशी रुद्रदास सातकर, दुसऱ्या दिवशी नितीन शेटे तर तिसऱ्या दिवशी निखिल खांडगे यांच्या बैलगाड्याने फायनल सम्राटचा मान मिळवला.
ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. यानिमित्त भैरवनाथ महाराजांची पालखी व हारतुरेची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. देवाला हारतुरे अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बैलगाडा घाटाचे पूजन झाले. या शर्यतीत तीन दिवसात एकूण ६०० बैलगाडे धावल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच जितेंद्र काळोखे यांनी दिली. पहिल्या क्रमांकासाठी एकूण १३०, दुसऱ्या क्रमांकासाठी १५१, तिसऱ्या क्रमांकासाठी ८२ तर चौथ्या क्रमांकासाठी ३६ बैलगाडे पात्र ठरले.
पहिल्या दिवसाचा घाटाचा राजा हा किताब कार्तिक गाडे (सुदुंबरे) यांच्या बैलगाड्याने पटकावला, तर ओवीताई मांडेकर (आंबेठाण) यांचा बैलगाडा फळीफोडचा मानकरी ठरला. दुसऱ्या दिवशी विघ्नेश घोलप-साईराज मोरे यांचा बैलगाडा घाटाचा राजा तर अमोल नेहेरे-पपट्या ग्रुप यांचा बैलगाडा फळीफोड झाला. तिसऱ्या दिवशी दिग्विजय सातकर यांचा बैलगाडा घाटाचा राजा व श्रुती पाटोळे यांचा बैलगाडा फळीफोडचा मानकरी ठरला.
पंचायत समितीचे सदस्य शंकर कावडे, दिलीप डुबे, निवृत्ती नेहेरे यांनी बैलगाडा शर्यतीनिमित्त घाटाला भेट दिली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र काळोखे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अतुल गारगोटे, दत्ता कंद, सचिव गणेश गारगोटे, उमेश गारगोटे, संतोष गारगोटे, महादेव शिंदे, हिरामण गारगोटे यांसह ग्रामस्थ, पुणेकर, मुंबईकर मंडळींनी उत्सवाचे यशस्वी नियोजन केले. जनकल्याण ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर बच्चे, दशरथ बच्चे, माजी सरपंच अशोक गारगोटे आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Credit Card यूजर्ससाठी दिलासा! आता बिल उशिरा भरलं तरी लगेच दंड नाही; RBI चा नवा नियम काय?

Pune news : टुरिस्ट व्हिसावर आले अन्... पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा, पोलिसांनी दिले देश सोडण्याचे आदेश

Aadhaar Design Change : आधार कार्डचा नवा अवतार! नाव-पत्ता गायब; फक्त फोटो अन् QR कोड, कशी आहे नवी डिझाईन? पाहा

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

SCROLL FOR NEXT