पुणे

कळस परिसरात शिंगी घुबडाचे दर्शन

CD

कळस, ता. २९ : लक्ष्मीचे प्रतिक असलेल्या शिंगी (शृगी) घुबडाचे वास्तव्य कळस (ता. इंदापूर) येथे आढळून येत आहे. दुर्मिळ होत असलेल्या शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही परिचीत असलेल्या या घुबडाची छबी टिपण्यासाठी पर्यटकांची पावले कळसकडे वळू लागली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून येथील खडकवासला कालव्यातील दाट झाडीवर या शिंगी घुबडाचे वास्तव्य आढळून येत आहे. दिवसा सहजपणे नजरेस पडणाऱ्या या घुबडाची छबी कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यासाठी उजनीवर येणारे पर्यटक कळसला भेट देत आहेत. ग्रामीण भागात अंधश्रद्धेपोटी घुबडांना हुसकावून लावण्याचे प्रकार होतात. यामध्ये घरावर फडफडणारा झेंडा लावणे, फटाके फोडणे यांसारख्या क्लृप्त्या केलेल्या पहायला मिळतात. मात्र धार्मिक शास्त्रानुसार घुबड हे लक्ष्मीचे प्रतिक असल्याचे सांगितले जाते.

शृंगी किंवा शिंगवाले घुबडाचा रंग गर्द तपकिरी असतो आणि अंगावर बदामी व काळ्या रंगाचे ठिपके आणि रेघा असतात. तपकिरी मत्स्य घुबड व शृंगी घुबड यांच्यामध्ये बरेच साम्य आढळून येते. ते किडे, खेकडे आणि मासेसुद्धा खातात. उंदिर आणि चिचुंदरी यांसारखे प्राणी खाऊन ते एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करतात. यामुळे या पक्ष्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षी निरिक्षक, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था
.................
01835

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT