पुणे

गारांसह जोरदार पावसाने रुई परिसराला झोडपले

CD

कळस, ता. २९ : गेल्या दोन दिवसांपूर्वीच वादळाने तडाखा दिल्यानंतर आज (ता.२९) रुई परिसराला गारांसह जोरदार पावसाने झोडपून काढले. परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी कडक उन्हाचा सामना करावा लागला. यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला. पावसासह गारांचा वर्षाव होवू लागला. यामुळे नागरिक, गुराखी, शेतात काम करणाऱ्या मजुरांची चांगलीच त्रेधातिरपीट झाली.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच रुईसह कळस परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला होता. यामध्ये दुकानांवरील पत्र्याचे छत उडून गेले होते. वीजेचे खांब कोसळले होते. तर आज झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, चारा, कांदा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय आंबा पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. तर कळस परिसरात केवळ पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पिकांचे एक पाणी देणे वाचले असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
...........
01839

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT