कळस, ता. १२ : येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत एका खडीक्रशरला ना हरकत दाखला देण्याच्या विषयावर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान दोन सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. ग्रामपंचायत सभागृहाच्या बंद दाराआड झालेल्या ‘तु-तू-मैं-मैं’ खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत गेला. सदस्यांच्या भांडणामुळे भयभयीत महिला सदस्यांनी बैठक सोडून तेथून काढता पाय घेतला. बुधवारी (ता. १२) दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे गावात दिवसभर उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.
कळस (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सभागृहात जलजीवन मिशनच्या कामाबाबत व येथील एका खडी क्रशरला ना हरकत दाखला देण्याबाबत चर्चा करण्याठी बुधवारीसरपंचांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची मासिक बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी येथील खडीक्रशरच्या विषयावर चर्चा करताना दोन सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान यावेळी खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत हे प्रकरण गेले. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहली जात होती. सभागृहाच्या बंद दाराआड मोठ्याने सुरु असलेल्या या भांडणामुळे अन्य कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आलेले लोक काही वेळ संभ्रमावस्थेत होते. मात्र, काही वेळानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर, सदर घटनेची बातमी गावभर पसरली. यानंतर दिवसभर या भांडणाचा विषय ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. गावाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी निवडलेल्या सदस्यांमध्येच जर भांडणे होत असतील तर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा ठेवणे व्यर्थ असल्याचे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले.
दरम्यान,ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव यांच्याकडे या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सदर प्रकारावर भाष्य करण्याचे टाळले.
खडीक्रशरमुळे गावाचे वातावरण दुषित
ज्या खडीक्रशरच्या ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भांडणे झाली आहेत, त्या खडीक्रशरमुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांना त्रास होत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या खडीक्रशरच्या विरोधात अनेकदा उपोषण, आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी झालेल्या असल्याचेही बोलले जात आहे. त्या खडीक्रशरवर तहसीलदारांनी कोट्यवधींचा दंड ठोठावल्याचेही चर्चा आहे मग एवढ्या वादातल्या खडीक्रशरला नव्याने ना हरकत दाखला देण्यासाठी झालेल्या बैठकीतच वाद निर्माण झाल्याने गावातील सलोख्याचे वातावरण दुषित झाल्याची प्रतिक्रीया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.