पुणे

कळसमध्ये जंगली गुलाब प्रजातीची निर्मिती

CD

कळस, ता. १३ : विविधरंगी गुलाबाची रोपे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या जंगली गुलाबाच्या वेगळ्या प्रजातीची निर्मिती करण्यात कळस (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याला यश आले आहे. बाळासाहेब गोरख पानसरे या शेतकऱ्याने जंगली गुलाबाच्या बेटातून वेगळी प्रजाती शोधून त्याचा विस्तार केला आहे.
गुलाब निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांची गरज ओळखून पानसरे यांनी तयार केलेला जंगली गुलाब रोपांच्या काडीसाठी फायदेशीर ठरत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांनी केलेल्या परिश्रमातून या वेगळ्या जंगली गुलाबाचा विस्तार केला आहे. दरवर्षी येथे सुमारे ७५ लाखांहून अधिक जंगली काडीला मागणी आहे.
कळस परिसरात सुमारे ४० रोपवाटिका असून, येथे वर्षभरात ५० लाखांहून अधिक गुलाबाच्या रोपांची निर्मिती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बोर्डो, डिवाईन, ग्लॅडेटर, सुपरस्टार यासारख्या वीसहून अधिक प्रजातीची गुलाब रोपे तयार होतात. यामुळे येथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रजातीच्या गुलाबाचे कलम करण्यासाठी आवश्यक असलेल्या जंगली गुलाबाच्या काडीची मोठ्या प्रमाणात गरज भासते. यामुळे येथील अनेक शेतकरी जंगली गुलाबाची लागवड करतात. यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वरी, लोणावळा आणि मल्टी या जातीच्या जंगली गुलाबाची लागवडीस शेतकरी प्राधान्य देतात.

इतर जंगली गुलाबाच्या झाडांची वाढ होताना त्याच्या फांद्या जमिनीवर पसरतात. परिणामी त्या झाडांची मशागत करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. फांद्या परल्याने शेतातून चालणेही मुश्लिक होते. काडी छाटणी करताना त्रास होतो. शिवाय फांद्याच्या वाढीस मर्यादा येतात. परंतु आम्ही निर्मिती केलेला जंगली गुलाब सरळ व उंच वाढत असून, आठ महिन्यात सुमारे सहा फुटांहून अधिक उंची झाली आहे. यामुळे मशागत करणे सोपे होत आहे. जंगली गुलाब लागवडीतून उसापेक्षा जास्तीचे उत्पन्न मिळविता येते.
- बाळासाहेब पानसरे, फूल उत्पादक


खर्च वजा जाता मिळते दोन लाखांचे उत्पन्न
येथील प्रगतशील शेतकरी सुरेश पानसरे म्हणाले, यंदा जंगली गुलाब काडीला चांगली मागणी राहिली आहे. सध्या एक हजार काडीचा दर दीड हजार रुपयांपर्यंत आहे. रासायनिक खते-औषधे न वापरता सेंद्रिय पद्धतीने जोपासलेल्या जंगली गुलाबाच्या काडीला मागणी असते. एक एकर क्षेत्रामध्ये दोन लाख गुलाब काडी मिळते. सध्याच्या बाजारभावानुसार हिशोब केल्यास यातून तीन लाख रुपये उत्पादन मिळते. जंगली जोपासण्यासाठी वर्षभराचा खर्च वजा केल्यास दोन लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळते.

02946

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT