पुणे

पळसदेवचे सरपंच जाधव यांचा राजीनामा

CD

पळसदेव, ता. ३१ : पळसदेव (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुमारे ११ महिन्यांपूर्वी विराजमान झालेल्या सरपंच अंकुश भीमराव जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता उरलेल्या ९ महिन्यांसाठी सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.
जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर इंद्रायणी सुजित मोरे यांना सरपंच पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यांनी दोन वर्षांहून अधिक काळ गावगाडा हाकला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सरपंचपदाच्या निवडीत झालेल्या राजकीय गटबाजीत आजिनाथ पवार यांना सरपंचपदाची खुर्ची मिळाली. त्यांनी वर्षभराहून अधिक काळ सरपंचपदाची धुरा सांभाळल्यानंतर राजीनामा दिला. यानंतर अंकुश जाधव यांना सरपंचपदी विराजमान करण्यात आले. जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे आता सरपंचपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. या खुर्चीवर बसण्याचा बहुमान कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उरलेल्या ९ महिन्यांच्या कालावधीसाठी सरपंचपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच होणार असल्याची शक्यता आहे. कारण, पुढील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाची निवड जनतेतून होणार आहे.

अभी नही तो कभी नही
अंकुश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठ्या अंतर्गत घडामोडी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापुढे जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सदस्यांच्या मतांवर सरपंच होण्याची एवढीच संधी आहे. यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’र असे म्हणत काही इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT