पुणे

पळसदेवच्या सरपंचपदासाठी चुरस

CD

पळसदेव, ता. २५ : इंदापूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या यादीत अग्रभागी असलेल्या पळसदेव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २७) होणार आहे. इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांकडून सध्या इतर सदस्यांची मनधरणी सुरु आहे.
ग्रामपंचायतीचा सुमारे ९ महिन्यांचा कार्यकाल उरला असल्याने प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या या पदासाठी इच्छुकांची बोर्डावर नाव लावण्यासाठी धडपड सुरु आहे. इतर मागास प्रवर्गामध्ये कुणबी मराठा समाविष्ट असल्याने सध्याच्या सदस्यांपैकी काही सदस्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. यामुळे त्यांच्याकडून सरपंचपदाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी येथे चुरस निर्माण झाली असून, एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. १५ सदस्य संख्या असल्याने ८ सदस्यांचे मत आपल्या बाजूने घेऊन बलाबल तयार करण्यासाठी सदस्यांची मनधरणी सुरु आहे. निवडणूक कार्यक्रम दोन दिवसांवर आल्याने अनेक सदस्य गायब झाले आहेत. यामुळे सरपंचपदासाठी जातीय समीकरण वापरले जाण्याची शक्यता आहे.
सन २०१९ मध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गावातील दोन गटांमध्ये ८-७ असेल बलाबल झाले. यामुळे येथील इंद्रायणी सुजित मोरे यांना सुरवातीचे दोन वर्षे सरपंचपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या गटातील सदस्यांमध्ये मनभेद झाल्याने विरोधी गटातील अजिनाथ पवार यांना सरपंचपदाची खुर्ची मिळाली. ठरल्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्यानंतर अंकुश जाधव सरपंचपदी विराजमान झाले. त्यांनीही सुमारे ११ महिने गावगाडा हाकला. त्यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवड कार्यक्रम जाहीर केला आहे.

पाच वर्षात चार सरपंच
ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद जनतेतून निवडले जाणार आहे. यामुळे सदस्यांच्या मताच्या जिवावर सरपंचपद मिळविण्याची ही शेवटची संधी आहे. सध्याच्या कार्यकालात पाच वर्षात चौथ्यांदा सरपंचपदाची निवड होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT