पळसदेव, ता. ३१ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनातील सहभागी आंदोलकांना पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामस्थांनी टेंपो भरुन जेवण पाठविले आहे. येथे सकल मराठा समाजाबरोबर ओबीसी व मुस्लिम बांधवांनीही भाकरी, चपाती, ठेचा, लापशी, शिरा असे खाद्यपदार्थ तयार करुन दिले.
समाजाने दिलेली शिदोरी आंदोलनकर्त्यांना बळ देईल, अशी आशा येथील सकल मराठा समाजाच्या भगिनींनी व्यक्त केली. गावातील सकल मराठा समाज, ओबीसी व मुस्लिम बांधवांनीही वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करुन एकत्रित जमविले. माळेवाडी, बांडेवाडी, काळेवाडी भागातील लोकांनी हा शिधा जमा केला. याशिवाय पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही जमा करण्यात आल्या. हे सर्व साहित्य गावातून दोन टेंपोमध्ये भरुन मुंबईत आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांप्रती सामाजिक बांधिलकेच्या दृष्टीकोनातून इतर समाजानेही केलेली मदत, सामाजिक सलोखा निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.