पुणे

रुई येथे प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

CD

कळस, ता. २४ : रुई (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी सहभागी शेतकऱ्यांना उपयोगी साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच प्रगतशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

यामध्ये एलोरा सीड्स, कावेरी सीड्स आणि देहात या कंपन्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे वापर, पीक व्यवस्थापन व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले.
कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ, एलोरा सीड्सचे लिंगेश्वर लवटे, कावेरी सीड्सचे मनोज भोसले, कृषी सहाय्यक गणेश देवडे, देहात कंपनीचे ऋषभ मोहिते, इंदापूर तालुका अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे वैभव पाटील उपस्थित होते.
अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदापूर तालुका अग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ पोटफोडे, कृषीसखी शुभांगी मराडे यांनी परिश्रम घेतले.

03209

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

Property Tax : मिळकतकरात वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT