पुणे

कडबनवाडीत परदेशातून हिवाळी पाहुण्यांचे आगमन

CD

सचिन लोंढे ः सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. २६ ः जागतिक निसर्ग संरक्षण संघटनेच्या अहवालानुसार ‘संकरग्रस्त’ प्रजातींमध्ये मोडणाऱ्या शबल ससाणा (पांढुरका भोवत्या) या शिकारी पक्षाचे इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी वनक्षेत्रात वास्तव्य आढळून आले आहे. पूर्व युरोप आणि मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हिवाळी पाहुणे म्हणून येथे दाखल झाले आहेत.
या पक्षांचा आगामी चार महिने येथे मुक्काम असण्याची शक्यता पक्षी निरिक्षक व्यक्त करीत आहेत. यामुळे उजनीच्या पाणस्थळ ठिकाणांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पक्षी निरिक्षकांना कडबनवाडीच्या माळरानावर परदेशी शिकारी पक्षांचे निरिक्षण व छायाचित्रण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कडबनवाडी येथील वनक्षेत्रामध्ये नर जातीचा शबल ससाणा पक्षी नुकताच आढळून आला आहे. फिकट करड्या रंगाचा या नर ससाण्याची जोडीदार मादी तपकिरी रंगाची असते. हा पक्षी कमी उंचीवरून उडत जमिनीवरील आपल्या खाद्याची चतुराईने शिकार करतो. या पक्षाशिवाय आखूड कानांचा घुबड, सरडमार भोवत्या, नेपाळी गरुड, अमूर ससाणा, मोठ्या ठिपक्यांचा गरुड यांसारखे शिकारी पक्षी आढळून येत आहेत. यामुळे इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र हिवाळ्यातील शिकारी पक्षांचे मुक्कामाचे ठिकाण झाल्याचे बोलले जात आहे. येथील चिंकारा वन विहारात सफारी गाइड सुयोग गावडे यांना या दुर्मिळ ससाण्याचे दर्शन झाले. त्यांनी या ससाण्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे.

वन सफारीसाठी येणाऱ्या पक्षी निरिक्षकांना माहिती देत असताना शबल ससाण्याचे दर्शन घडले. उजनी धरणात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे कडबनवाडीसारख्या गवताळ वन क्षेत्राकडे शिकारी पक्षांनी खाद्यान्नासाठी मोर्चा वळविल्याचे दिसून येते. येथे मुबलक प्रमाणात असलेल्या खाद्यान्नामुळे आगामी काही महिने त्यांचे वास्तव्य येथे कायम असेल.
- सुयोग गावडे, सफारी गाइड, कडबनवाडी

वन्य प्राण्यांची संख्याही वाढली
कडबनवाडी परिसरात जल व वन संवर्धनाचे मोठ्या प्रमाणावर झालेले काम जैवविविधतेला पूरक ठरले आहे. कित्येक संक्रमित जीवांसाठी आता हक्काचे संरक्षित ठिकाण निर्माण झाल्याचे समाधान आहे. येथे चिंकारा, लांडगा, तरस, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. याशिवाय आता स्थलांतरित पक्षांनीही या भागाला मुक्कामाचे ठिकाण बनविले आहे. यामुळे गेल्या २५ वर्षांपूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उचलेले पाऊल आज योग्य दिशेने गेल्याचे समाधान येथील माजी सरपंच तथा पर्यावरण मित्र भजनदार पवार यांनी व्यक्त केले.

शबल ससाणाचे खाद्य
उंदीर
खारुताई
सरडे
किटक
छोटे पक्षी
पक्षांच्या घरट्यातील पिल्ले

03221, 03222, 03223

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT