पुणे

पुणे- सोलापूर महामार्गावर ‘इंटरसेप्टर’ची नजर

CD

पळसदेव, ता. ३० ः पुणे- सोलापूर महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसविण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ७६० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यातून सुमारे १३ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
यापूर्वी येथे हस्तचलीत इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून कारवाई होत असे. मात्र, या यंत्रणेत मोठा बदल करून सध्या महामार्ग पोलिस मदत केंद्राला हे सुसज्ज स्वयंचलित इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून दिले आहे. या वाहनामध्ये अत्याधुनिक लेझर गन आणि कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे ते दुरूनच वाहनाचा वेग मोजतात. वेगमर्यादेचे उल्लंघन होताच, या वाहनातील संगणकीय प्रणालीद्वारे संबंधित गाडीचा क्रमांक टिपला जातो आणि ऑटोमॅटिक चलान तयार होऊन थेट वाहनचालकाच्या मोबाईलवर धडकते.
इंदापूर ते भिगवण टप्प्यात महामार्गावर वेगमर्यादा ठरवून दिली आहे. यामध्ये दुचाकी ७० किमी प्रतितास, मोटार ९० किमी प्रतितास, तर अवजड वाहनांना ८० किमी प्रतितास वेग ठरविण्यात आला आहे. इंटरसेप्टर वाहन महामार्गाच्या कडेला उभे राहून वेगावर लक्ष ठेवते. गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर कॅमेरा फोटो काढतो. यामुळे पोलिसांशी वाद घालण्याची संधी चालकांना उरत नाही. कारण पुराव्यासह ऑनलाइन दंड आकारला जातो.

महिनाभरातील कारवाईचा तपशील
वाहन प्रकार.... वाहनांची संख्या.... दंडाची रक्कम
दुचाकी..........७ .................७ हजार रुपये
मोटार.......... ६७८..................११ लाख ९५ हजार ८०० रुपये
अवजड........ ७५................१ लाख ८० हजार रुपये
एकूण............७६०........१३ लाख ८२ हजार ८०० रुपये

अपघातांना आळा बसण्याची शक्यता
पुणे- सोलापूर महामार्गावर अतिवेगामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अनेकदा चालक वाहने वेगाने पळवतात. यातून अपघाताला निमंत्रण मिळते. मात्र, आता या इंटरसेप्टर गाडीमुळे महामार्गावर कोणत्याही ठिकाणी पोलिसांना लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.

महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये. इंटरसेप्टर वाहनाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपोआप दंडात्मक कारवाई होत आहे. यामुळे महामार्गावरून प्रवास करताना वेगमर्यादा राखून सुरक्षित प्रवास करा.
- सोमनाथ पडसळकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक, महामार्ग पोलिस मदत

03248

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT