पुणे

‘अधिकारी महासंघाचा आधारस्तंभ हरपला’

CD

पळसदेव, ता. २९ ः ‘‘अधिकारी महासंघाचे मार्गदर्शक, हितचिंतक, संघटनाप्रेमी लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले. ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी व धक्कादायक असून, राज्याचे फार मोठे सामाजिक व राजकीय नुकसान करणारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, ‘‘देशातील महत्त्वाच्या महाराष्ट्र या पुरोगामी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नात्याने त्यांनी राज्याचा कार्यभार दीर्घकाळ सक्षमपणे सांभाळला आहे. अजितदादा एक उत्तम प्रशासक, लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व होते.
अजितदादा म्हणजे, वेळेचे महत्त्व जाणणारा, भल्या पहाटे कामाला लागणारा, कामाची प्रचंड उरक आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता होय. राज्यातील अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसंबंधी, तसेच अधिकारी महासंघाच्या कल्याणकेंद्र उभारणीसाठी महासंघस्नेही स्वर्गीय अजितदादांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत होते.’’
यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे, महिला मंच अध्यक्षा सिद्धी संकपाळ आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकारी महासंघाच्यावतीने शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

SCROLL FOR NEXT