पुणे

रुईच्या ‘इंदापूर ॲग्रो फार्मर’ला राज्यस्तरीय पुरस्कार

CD

कळस, ता. ९ : रुई (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीला ‘उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारामतीमधील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मंथन सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर संचालक मंडळ व सभासद शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

इंडिया टुडे ग्रुप, किसान तक आणि स्टील कंपनी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘स्टील किसान सन्मान सोहळा व प्रगत कृषी तंत्रज्ञान परिसंवाद’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा वितरण सोहळा पार पडला. यामध्ये इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीला सन्मानित करण्यात आले.

वैभव पाटील यांच्या योगदानातून ग्रामीण भागातील या कंपनीने शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून, अल्पावधीत भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध करून देत बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण केली आहे. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक सभासद शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर’
पुरस्कार स्वीकारताना वैभव पाटील म्हणाले की, सन्मान संस्थेतील प्रत्येक सभासद शेतकऱ्याचा आहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करू. शेतकऱ्यांना सक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान संपन्न बनविण्याचा आमचा संकल्प आहे. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून अधिक नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर आमचा भर राहील.

03487

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT