पुणे

इंदापुरात पाणाड्यांची ‘हायटेक‘ जाहिरातबाजी

CD

पळसदेव, ता. १८ : शेतात प्रत्यक्ष न जाता आता पाणाडे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घरबसल्या जमिनीखालील पाण्याचा शोध घेऊ लागले आहेत. इंदापूर तालुक्यासह परिसरात पाणाड्यांची ही ‘हायटेक’ पद्धत चर्चेचा विषय ठरली असली, तरी भूजल तज्ज्ञांनी मात्र हा प्रकार अशास्त्रीय असल्याचे सांगत शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने पाणी पातळी घटली आहे, त्यामुळे नवीन विंधनविहिरी घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. हीच संधी साधून काही पाणाड्यांनी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलचा आधार घेतला आहे. शेतकरी शेतात मोबाईल घेऊन फिरतो आणि पाणाडा स्क्रीनवर पाहून, हातातील नारळाच्या हालचालींवरून पाण्याचे ठिकाण निश्चित करतो. या प्रक्रियेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजीही केली जात आहे.

व्हिडिओ कॉलवरून पाण्याचा अंदाज घेणे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. जमिनीखालील खडक आणि पाण्याचे थर केवळ कॅमेरा पाहून समजू शकत नाहीत. अशा पद्धतींवर अवलंबून राहणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे केवळ श्रद्धेपोटी अशा दाव्यांना बळी पडू नये.
- दिवाकर धोटे, प्रभारी उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: दुष्काळात तेरावा! उपनगरात विजेचं महासंकट, तळोजा उपकेंद्रात भीषण आग; वीजपुरवठा खंडित

Pune: आंबेगावच्या मातीतून घडले शेतकरी कुटुंबातील चार पोलीस उपनिरीक्षक; वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

Navi Mumbai: डेटा सेंटरसाठी २८२ कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडचा १०० व्या सामन्यात शतकी धमाका! द्रविड-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT