कळस, ता. १९ ः कळस (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या जयहिंद फिड्स या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाकडे ग्रामपंचायतीची सुमारे ४६ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही व्यवस्थापनाकडून कराचा भरणा केला जात नसल्याने, आता ग्रामपंचायतीने कारवाईचा इशारा दिला आहे.
घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असते. या करातून जमा होणाऱ्या रकमेतून गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजनांची देखभाल, पथदिवे आणि स्वच्छतेची कामे केली जातात. मोठे प्रकल्प गावात येतात तेव्हा रोजगारासोबतच गावाच्या महसुलात भर पडेल ही अपेक्षा असते. मात्र, कराची रक्कम वसूल होत नसल्याने, विकासकामांना खीळ बसत आहे.
प्रशासक सरपंच सविता खारतोडे म्हणाल्या, ‘‘जयहिंद फिड्स प्रशासनाला आतापर्यंत अनेकदा लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चर्चेच्या फेऱ्या होऊनही गेल्या. दहा वर्षांपासून प्रकल्प व्यवस्थापनाने कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. प्रशासकीय स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ४६ लाख रुपयांची कराची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.’’
याबाबत जयहिंद फिड्सचे मनुष्यबळ व्यवस्थापक विनोद गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.