पुणे

कळसमध्ये दोन दुकाने फोडली

CD

कळस, ता. २२ : कळस (ता. इंदापूर) येथे मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून रोख रकमेसह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. छताचा पत्रा कापून आणि शटर उचकटून चोरट्यांनी हे धाडसी कृत्य केले.
विशाल खारतोडे यांच्या ''श्रीराम हार्डवेअर''चे छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ३० हजारांचे कॉपर वायर बंडल, २० हजारांचे स्टार्टर, ७ हजारांचा विद्युत पंप आणि ७ हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरला. त्यानंतर लगतच्या ''श्रीराम गिफ्ट शॉपी''चे शटर उचकटून ३० हजारांची रोकड आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचा मुलामा असलेले दागिने लंपास केले. पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी दोन्ही दुकानांतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि बाहेरील कॅमेऱ्यांच्या केबलही कापून नेल्या आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. तीन वर्षांपूर्वीही याच दुकांनामध्ये चोरी झाली होती, मात्र अद्याप त्याचा छडा लागलेला नाही.
ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद
आपत्कालीन काळात ग्रामस्थांना सतर्क करणारी ''ग्रामसुरक्षा यंत्रणा'' गेल्या काही वर्षांपासून कळसमध्ये बंद आहे. खर्चाअभावी ग्रामपंचायतीने ही यंत्रणा बंद ठेवल्याने चोरीच्या घटनांवेळी ग्रामस्थांना सूचना मिळणे कठीण झाले आहे. ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

SCROLL FOR NEXT