

Vaibhav Sooryavanshi
esakal
Ravi Shastri Wants Youngster In Team India: आयपीएल (IPL)२०२६ मध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, त्यापैकी वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) हे एक नाव आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेक पराक्रम आपल्या नावावर केले आहेत. काल देखील त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध(RCB) खेळताना एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला. त्याने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने काल अभिषेक शर्माचा ४२ षटकारांचा विक्रम मोडीत काढत ४३ षटकार पूर्ण केले. त्याच्या कामगिरीवर खुश होऊन रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला एक मोठं आव्हान केलं आहे.