पुणे

काळेवाडीतील उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा मोर्चा

CD

पळसदेव, ता. २७ ः उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची परवड काही थांबायचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढलेली असताना, दुसरीकडे शेतीसाठी करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत आहे. फुटवाॅलचे पाणी दाऱ्यापर्यंत पोचण्याअगोदरच वीज गायब होत असल्याने, पळसदेव (ता. इंदापूर) येथील वैतागलेल्या शेतकऱ्यांचा आज काळेवाडी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा धडकला. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
सध्या पाणीपट्टीसाठी पाटबंधारे विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. तर वीज वितरण कंपनीकडून वारंवार वीज खंडीत केली जात आहे. केबल किंवा तारा बदलणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे यांसारख्या तांत्रिक कामांचे कारण पुढे करून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जातो. गेल्या काही दिवसांपासून विजेची ही समस्या कायम असून, वीज वितरण कंपनीने यावर ठोस उपाययोजना केली नाही. पिकांची पाण्याची तहान भागविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना या समस्यांना तोंड देता-देता नाकीनऊ आल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


शेतीसाठी दिवसा ८ तास सलग वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. ८ तासांमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्याने, खंडीत वेळेतील वीज पुढे वाढवून दिली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
-गणेश काळे, शेतकरी


वीज उपकेंद्रावरील तांत्रिक दोष दूर करण्यात आला आहे. मात्र उपकेंद्राला येणारा पुरवठा बंद झाल्याने, अचानक उद्भवलेल्या भारनियमनाला सामोरे जावे लागले आहे.
-प्रमोद जाधव, शाखा अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

SCROLL FOR NEXT